जळगाव: माहेश्वरी सखी मंडळाचा पदग्रहण सोहळा महेश प्रगती मंडळ येथे झाला. या वेळी माजी अध्यक्षा राखी मुंदडा यांनी नूतन अध्यक्षा अनिता सोमाणी यांना तर माजी सचिव अनिता सोमाणी यांनी नूतन सचिव सीमा नवाल यांना कार्यभार सोपवला.
पदग्रहण साेहळ्यात सरप्राइज गेम खेळवण्यात आले. सरिता बिर्ला, संजना बिर्ला यांनी महेश वंदना म्हटली. सरोज नवाल, कविता झंवर यांनी स्वागत गीत गायन केले. संस्थापिका सुनीता तापडिया, संचालिका ज्योती जेथले, खजिनदार मीना जाखेटे, सारिका मंडोरा, सुरेखा झंवर, वंदना सोमाणी, निर्मला कलंत्री, इंदू लढ्ढा, दीपा मंडोरा, सरोज नवाल, कविता झंवर, संगीता काबरा, सुशीला मंडोरा, शारदा सारडा, चित्रा मालपाणी, पूनम सोमाणी यांची निवड करण्यात आली. कौसल्याबाई मुंदडा, पुष्पा काबरा यांची उपस्थिती होती. रेखा चांडक, प्रीती दहाड यांनी सूत्रसंचालन केले.