मिग-23 कोसळले, वैमानिक बचावल

0

जोधपूर । आठवडाभरातच हवाई दलाचे आणखी एक विमान कोसळून दुर्घटना घडली आहे. राजस्थानमधील जोधपूरजवळ हवाई दलाचे मिग – 23 हे लढाऊ विमान कोसळले. विमानातील दोन्ही वैमानिक सुखरुप असून वेळीच विमानातून बाहेर पडल्याने दोघेही बचावले आहेत. या दुर्घटनेचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.