हिसार : पंजाब स्टेट बम्पर ड्रामध्ये फतेहाबाद जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील मिठाईवाला चक्क करोडपती बनला आहे. त्याला दीड कोटींची लॉटरी लागली आहे. अचानक आझाद सिंह करोडपती झाल्याने गावानेही जल्लोष व्यक्त केला आहे. त्यामुळे गावकर्यांनी जुलूस काढला आणि महिलांनीही गाण्यावर ठेका धरला. आझाद सिंह हे करोडपती बनल्यानंतर त्यांच्या घराबाहेर गावकर्यांनी गर्दी झाली होती. आझाद सिंह म्हणाले, मला लॉटरी खेळण्यात कोणतीही आवड नव्हती. मात्र, दोन महिन्यांपूर्वी कामाच्या निमित्ताने सिरसा येथे गेलो असता रस्त्यावरही लॉटरीचे दुकान पाहिले. त्यानंतर मला लॉटरी काढण्याची हुक्की आली आणि पंजाब स्टेट बम्पर लॉटरीचे 200 रुपयांचे तिकीट विकत घेतले. त्यानंतर सोमवारी दीपक लॉटरी एजन्सीमधून त्यांना फोन आला आणि त्यांना दीड कोटींची लॉटरी लागल्याचे कळवण्यात आले.