हैदराबाद । महिला विश्वचषक स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या भारतीय संघावर आता पारितोषीकांचा वर्षाव होत आहे. सेवेत असलेल्या ठिकाणी त्यांना बढत्या दिल्या जात आहेत. पण या सगळ्या वातावरणात कर्णधार मितालीचे गृहराज्य असलेल्या तेलंगणाने मात्र चुप्पी साधली आहे. तत्कालीन आंध्रप्रदेश सरकारने 2005 मध्ये महिला संघ उपविजेता झाल्यावर मितालीला 500 स्केवर यार्ड जमीन देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वायएस राजशेखर रेड्डी
यांनी केली होती.
पण या घोषणेला आता 12 वर्षांचा कालावधी ऊलटून गेल्यावरही सरकारने मितालीला दिलेेले वचन पाळलेले नाही. यावेळी 2017 मध्ये भारतीय संघ पुन्हा उपविजयी झाल्यावर मितालीला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडून केवळ अभिनंदनाचे पत्र मिळाले आहे.