मिताली आयसीसीच्या संघाची कर्णधार

0

लंडन । भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज विश्‍वचषक जिंकण्यात अपयशी ठरली असली, तरी स्पर्धेतील कामगिरीमुळे मितालीची आयसीसी महिला विश्‍वचषक 2017 संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. आयसीसीने सोमवारी 12 सदस्य असलेल्या संघाची घोषणा केली. त्यात उपांत्य फेरीत 171 धावांची खेळी करणार्‍या अष्टपैलू हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्माचा समावेश करण्यात आला आहे. या संघात विश्‍वचषक विजेत्या इंग्लंडच्या संघातील पाच, द. आफ्रिकेचे तीन आणि ऑस्टेे्रलियाच्या एका खेळाडूचा समावेश आहे.