मिताली राजचे प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर गंभीर आरोप

0

नवी दिल्ली : महिला ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. या सामन्यात माजी कर्णधार मिताली राजला खेळवण्यात आले नव्हते. यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. नंतर आता मितालीने स्पष्टीकरण देताना प्रशिक्षक रमेश पोवारवर गंभीर आरोप केले आहे.

वेस्ट इंडिजला पोहोचल्यावर माझ्या आणि पोवार यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्यावेळी त्यांनी मला अपमानित केले होते. त्याचबरोबर प्रशासकीय समितीमधील माजी कर्णधार डायना एडल्जी यांनी आपल्या पदाचा वापर करत मला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला असे आरोप मिताली राज याने केले आहे. मितालीने बीसीसीआयचे मुख्य प्रशासकीय अधिकारी राहुल जोहरी आणि क्रिकेट ऑपरेशन्स पाहणारे माजी क्रिकेटपटू साबा करीम यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये मितालीने पोवार आणि डायना यांच्यावर आरोप केले आहेत.