मितावली येथील वृद्धाचा चक्कर आल्याने मृत्यू !

0

जळगाव । चोपडा तालुक्याल मितावली येथील 60 वर्षीय शेतकरी शेतात काम करतांना भर उन्हात हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली. शेतकर्‍यास अस्वस्त वाटत असल्याने शेतात काम करणार्‍या मजूरांनी त्यांना अडावद येथील रूग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील मितावली येथील शेतकरी आनंदा गुपसिंग पाटील (वय-60) हे पारगाव शेत शिवारात स्वतःच्या शेतातील मक्क्याच्या शेतात मजूरांसोबत काम करत असतांना अचानक जमिनीवर पडले. त्यानंतर सोबत काम करणार्‍या मजूरांनी त्यांना उपचारासाठी तात्काळ अडावद येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र त्यांच्या प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद चौधरी यांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यांना मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात बाळू पाटील, छोटू पाटील हे दोन मुले तर पत्नी असा परीवार आहे. पो.कॉ. प्रदिप बडगुजर यांनी जळगाव शहर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शुन्य वर्गाने अडावद पोलिसात वर्ग करण्यात आली आहे.