मित्रपक्षही मोदींच्या नावावर निवडणुका लढतात : फडणवीस

0

पटना: सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू एकत्र येत ही निवडणूक लढत आहे. नितीश कुमार हेच भाजप-जेडीयूच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. बिहार निवडणुकीत भाजपने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विशेष जबाबदारी दिली आहे. ते बिहार निवडणुकीचे प्रभारी आहेत.

बिहार निवडणुकीत भाजप मोदींच्याच नावावर मत मागत असल्याचे आरोप होत आहे. दरम्यान यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशाचा विश्व आहे. आम्ही बिहारमध्ये कोठेही गेलो आणि सभेत मोदींचे नाव घेतले की लोकांमाधेय उत्साह दिसून येतो. आम्हीच नाही तर मित्र पक्ष देखील मोदींच्याच नावावर मत मागतात. मोदींच्या नावाचा त्यांनाही फायदा होती’ असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेने एकत्र येत विधानसभा निवडणूक लढविली. भाजप-सेना युतीला बहुमत देखील मिळाले मात्र शिवसेनेने भाजपसोबत न जाता कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार बनविले. त्यानंतर भाजपकडून शिवसेनेवर आरोप करण्यात आले. मोदींच्या नावाने शिवसेनेला अधिक जागा मिळाल्याचे आरोप भाजपकडून होत असतात. तोच फायदा बिहार निवडणुकीत देखील मित्रपक्षांना होणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.