मुंबई- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. जागावाटप तसेच इतर बाबतीत आतापासून तयारी सुरु झाली आहे. दरम्यान भाजपसोबतची युतीबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याने भाजपने मित्रपक्ष दुखविला जावू नये यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील पराभवानंतर भाजपा एक पाऊल मागे जाताना दिसत आहे. मित्रपक्षांच्या बाबातीत नमती भूमिका घेत भाजपा वाटाघाटी करताना मित्रपक्ष दुखावले जाऊ नयेत यासाठी प्रयत्न करत आहे. सरकार विरोधात सतत विरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेना नाराज होणार नाही याची काळजी भाजप घेत आहे. यासाठीच शिवसेनेवर भाजप नेत्यांनी टीका करू नये असे आदेश वजा सूचना भाजपा पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आल्याचे बोलले जात आहे.