मित्राचा वाढदिवस साजरा करून परतणारे दोघे तरुण किनगावजवळ अपघातात ठार

0

यावल- तालुक्यातील किनगाव येथे ट्रकने दुचाकीला कट मारून झालेल्या अपघातात दोघा मित्रांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. किनगाव खुर्द गावातील तरुण आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गावाबाहेरील हॉटेलमध्ये तरुणे गेले होते. रात्री 10.30 वाजता दुचाकीवर (एम.एच.19-सीबी.3597) जितेश ओंकार कोळी व महेश दिलीप कोळी (वय 24) घराकडे परतत असताना गावाजवळील चौफुलीवर यावलकडून जाणार्‍या एका अज्ञात ट्रकने दुचाकीला कट मारला. त्यामुळे दुचाकीस्वार दोघे रस्त्यावर कोसळले. अपघातात जितेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला तर महेश कोळी गंभीर जखमी झाल्याने त्यास जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले असता त्याचाही मृत्यू झाला.