मित्राच्या आजारपणामुळे मोदी दु:खी

0

नवी दिल्ली: पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचे आंतरराष्ट्रीय संबंध वाढले. दुसऱ्या देशात सतत येणे-जाणे वाढल्याने संबंध अधिक दृढ झाले आहेत. अनेक मित्र तयार झाले आहेत. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जवळचे मित्र बनले. मात्र आज शिंजो आबे यांनी आजारपणाचे कारण पुढे करत राजीनामा दिला. आबे यांच्या कार्यकाळात भारत आणि जपानचे संबंध अधिक दृढ झाले आहे. मात्र आबे यांनी राजीनामा दिल्याने आणि ते आजारी असल्याची माहिती मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ‘माझ्या मित्राच्या आजारपणाची बातमी ऐकून दु:ख झाल्याचे ट्वीट मोदींनी केले आहे. आबे लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही मोदींनी केली आहे.

मोदी-आबे यांच्यातील संबंध संपूर्ण जगाला ज्ञात होते. दोघांनी अनेक द्विपक्षीय करार केले.