मित्राने केला विनयभंग

0

दापोडी –येथे वर्ग मित्रानेच तरुणीवर विनयभंग केल्याची घटना रविवारी (दि. 8) घडली. यामध्ये तरुणीला तिच्या बहिणीला मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी 18 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, भोसरी पोलीस ठाण्यात प्रवीण किसन साळुंखे (वय 18, रा. दापोडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी व आरोपी हे दापोडी येथील एका महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेत होते. यावेळी तरुणाने माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू जर मला नकार दिला तर मी तुझ्या बहिणीला जीवे मारेन, अशी धमकी दिली. तसेच महाविद्यालयाबाहेर पडताच पीडितेसोबत अश्‍लिल वर्तन व मारहाण केली. तसेच पीडितेच्या वडिलांनाही धमकी देत पीडितेला त्रास दिला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 12) गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.