मित्राला देण्यासाठी पेट्रोल घेवून तिघे निघाले अन् काही अंतरावरच झाला अपघात

0

जळगाव – मित्राच्या दुचाकीने ट्रिपल सीट दुसर्‍या एका मित्राला त्याच्या दुचाकीचे पेट्रोल संपल्याने पेट्रोल घेवून जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणार्‍या कारने जोरदार धडक दिल्याची घटना नेरी नाका चौकात घडली. अपघातात पेट्रोल घेवून जाणारे दुचाकीवरील तिघे जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी कारचालकाविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सचिन अनिल सोनार (वय-28) रा. विठ्ठल पेठ हे रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास महाबळ येथे भाचीला घेण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच 19, 7876) ने पांझरापोळकडून जात होते, या दरम्यान त्यांच्या दुचाकीचे पेट्रोल संपले. त्यानंतर सचिन सोनार याने मित्र पवन गोपाळ बारी आणि रोशन शरद ढाके यांना फोनवरू बोलावून घेतले. 8.45 वाजेच्या सुमारास दोघे मित्र दुचाकी( एमएच 19 बीव्ही 0024) ने ट्रिपल सिट पेट्रोल देण्यासाठी निघाले. नेरी नाका चौकातून पांडे डेअरी चौकाकडे जात असतांना कोंबडी बाजार कडून भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक (एमएच 19 सीव्ही 6651) ने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले असून तिघांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यातील पवन बारी यांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी सचिन सोनार यांच्या फिर्यादीवरून कारचालक राजेश मदनलाल परिख रा. मरीमाता नगर यांच्या विरोधात शनीपेठ पोलस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय शेलार करीत आहे.