जळगाव । राज्यातील जिल्हा परिषदेच्या अधिकार्यामधील महाराष्ट्र विकास सेवा गट अ च्या 39 अधिकार्याचे बदल्यांचे आदेश आज ग्रामविकास विभागाचे उपसचिव वि.द.शिंदे यांनी पारीत केले. त्यात जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी मिनल कुटे यांची बदली जवळपास निश्चित झाली आहे. तर त्यांच्या जागी धुळ्याचे बी.ए.बोटे यांच्या बदलीचे आदेश पारीत झाले असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यातील चाळीसगाव येथील तत्कालीन गटविकास अधिकारी पी.एन.म्हैसकर यांच्या निलंबनाच्या काळानंतर त्यांना आता गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे गटविकास अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. चोपडा बीडीओ ए.जे.तडवी यांची पालघर जिल्ह्यातील विक्रमगढ येथे बीडीओ म्हणून बदली झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा पंचायत समितीचे बीडीओ बी.एल.पवार हे बोदवड पंचायत समितीत रूजू होणार आहे. अद्याप रूजूचे आदेश आलेले नाही.