नंदुरबार । तालुक्यातील घोटाणे येथून प्रवाशी घेऊन दोंडाईचाकडे जाणार्या मिनिडोअरला ट्रकने धडक दिली. यात एक महिला प्रवाशी जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या अपघातात रिक्षा चालकासह 3 जण जखमी झाले आहेत. नंदुरबार ,दोंडाईचा रस्त्यावरील न्याहली गावाच्या शिवारात हा अपघात झाला.
ट्रक चालकावर गुन्हा
तालुक्यातील घोटाणे येथून मिनी डोअर रिक्षा प्रवाशी घेऊन दोंडाईचा कडे जात होती. यावेळी भरधाव वेगात येणार्या ट्रक ने रिक्षाला जोरात धडक दिली, यावेळी झालेल्या अपघातात रिक्षा मधील रजूबाई शिवाजी गावित वय 44 ही महिला जागीच ठार झाली, तर मोहन देवराम कोळी रा,घोटाणे,राजाराम मास्तर,रा,आसने,मनोज गोसावी रिक्षा चालक हे जखमी झाले आहेत, या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, दोंडाईचा रस्त्यावर न्याहाली गावाच्या शिवारात दुपारी 11 वाजता ही घटना घडली, घटनास्थळी पोलिस दाखल झाले, त्यांनी पंचनामा करून ट्रक चालकांवर गुन्हा दाखल केला आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्ष पनामुळे हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या अपघातामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प होती.