मिनि मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन

0

महिलादिनी इंदापूर पोलिस स्टेशनचे कामकाज महिला पोलिसांकडे

इंदापूर : जागतीक महिला दिनानिमित्त इंदापूर पोलिस स्टेशन इंदापूर, युवा क्रांती प्रतिष्ठाण व मुस्लिम समाज इंदापूर यांचे सयुंक्त विद्यमाने गुरूवारी(दि.8) सकाळी महिला मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन इंदापूर मधील शंभर फुटी रोड या ठिकाणी करण्यात आले होते. महिला खुला गट,इयत्ता 5 वी ते 8 वी गट व 9 वी ते 12 वी अशा तीन गटात या स्पर्धा भरविण्यात आल्या. या स्पर्धेसाठी शेकडो महिला व शालेय विद्यार्थी मुली स्पर्धेत सहभागी झाल्याने इंदापूर शहर मॅरेथॉनमय झाल्याचे चित्र पहायला मिळत होते.

इंदापूर पोलिस निरिक्षक सजन हंकारे यांचे मुख्य मार्गदर्शना खाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.सहाय्यक पोलिस उप निरिक्षक ए.आर.ननवरे,सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक डी.एस.कुलकर्णी,गुप्त वार्ता विभागाचे विनोद पवार व सर्व पोलिस कर्मचारी स्टाफ तसेच सर्व होमगार्ड, युवाक्रांती प्रतिष्ठानचे प्रशांत सिताप, धरमचंद लोढा,मुन्ना बागवान,अस्लम बागवान,महिबूब मोमिन, यांनी परिश्रम घेतले.

विजेत्यांना बक्षिस
यामधे महिला खुल्या गटात डॉ.अश्‍विनी ठोंबरे,शितल परबते,रोहिणी मोहिते,तर शालेय विद्यार्थिनी 5 वी ते 8 वी गटात प्रणाली कासिद,वैश्‍नवी कासिद,ज्ञानेश्‍वरी लवटे,आणि 9वी ते 12 वी गटात पुजा शिंदे,शिवांजली कोळेकर,सानिका गदादे यांनी अणूक्रमे प्रथम,दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. या स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्या स्पर्धकाला ट्रॉफी,शाल श्रिफळ व रोख रक्कम देवुन गौरविण्यात आले.या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून शरद झोळ,मोहिते सर,व पवार सर यांनी काम पाहीले.

महिलांचा सन्मान
तर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्‍या सावित्रीच्या लेकिंचा सन्मान या वेळीे करण्यात आला. इंदापूर पोलिस स्टेशनमध्ये स्वच्छता दुत म्हणून काम करणार्‍या सफाई कर्मचारी कांबळे मावशी यांचा विशेष पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. महिला दिनानिमित मॅरेथॉन स्पर्धा व इतर कार्यक्रम राबविण्याचे इंदापूर पोलिसांचे हे दुसरे वर्ष आसुन पूणे जिल्ह्यामध्ये एकमेव इंदापूर या ठिकाणी पोलिसांच्या वतीने महिला दिनानिमात्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहीती विनोद पवार यांनी दिली.

कामकाज महिला पोलिसांकडे
जागतीक महीला दिनाचे औचित्य साधुन इंदापूर पोलिस निरिक्षक सजन हंकारे यांनी इंदापूर पोलीस स्टेशनच्या कामकाजाची धुरा महिला पोलिस कर्मचार्‍याच्या हाती सोपवून महिला पोलीसांना सन्मान दिला. ठाणे अमलदार म्हणून एस.एम.खंडागळे यांनी पाहिले.तर सी.सी.टी.एन.सी.मदतनिस म्हणुन एम.एच.माने यांनी काम पाहीले.वायरलेसचे कामकाज महिला काँस्टेबल टी.एन.पाडूळे यानी सांभाळले,तर लॉकअप गार्डचे कामकाज एस.एच.कुंदे यांनी पाहिले.यामध्ये दिवसभराच्या कामकाजादरम्यान इंदापूर पोलिस स्टेशन डायरीत दोन गुन्ह्यांची नोंद झाली तर दोन एन.सी दाखल करण्यात आल्या. 1 मिसिंग फाइल दाखल झाली तर महिलाविषयक 3 कौटुंबीक वाद आपसात तडजोडीने मिटविण्यात आल्याची माहीती ठाणे अमलदार म्हणून कामकाज पाहणार्‍या एस.एम.खंडागळे यांनी सांगीतले.