श्रीवर्धन । श्रीवर्धन येथे रिक्षांंमध्ये अनधिकृत प्रवासी वाहतुक होत असतानाच क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचेही समोर आले आहे. शाळेत येणार्या लहान लहान मुलमुली १७ किलो मिटरपासून मिनीडोअरमध्ये कोंबून येत असून त्या मिनीडोरमधून एखादा अपघात झाला तरी मिनीडोअर चालक मालक हे जबाबदारी घेत नाहीत तसेच मिनीडोरमध्ये आग लागल्यानंतर कोणतीही यंत्रणा दिसून येत नाही. शाळा प्रशासनाकडे कायदेशीर करार नसून मिनीडोरवाले आपल्या मर्जीनुसार लहान मुलांची शाळेमध्ये ये-जा वाहतूक करीत असतात. प्रत्येक मिनीडोरमध्ये १५ ते २० मुलेमुली कोंबून १७ कि.मी.पासून प्रवास करीत असतात. अशा वेळी मुलांची प्रवासात चेंगराचेंगरी होऊन याचा त्रास सहन करून प्रवासाला तोंड द्यावे लागते.
वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष
याबाबत शाळेमध्ये विचारणा केल्यास शाळा प्रशासनाकडे उत्तर नसून डॉ. ए.आर.उन्ड्रे हायस्कूल श्रीवर्धन या शाळेमध्येही जर का कोणत्याही कारणास्तव आग लागली, तर अशा ठिकाणी आग विझविण्याकरिता कोणतेही साधन यंत्रणा त्यांच्याकडे उपलब्ध नाही. अंजुमन शाळेमध्येही खासगी वागन मुलांना शाळेमध्ये पोहोचवण्याचे काम करीत असून त्यागाडीमध्येही आग विझवणे साहित्य तसेच प्राथमिक उपचार साहित्य नाहीत.
मुला व मुलींना नाक्यावर एकएक तास वाट पहावी लागते. अशा वेळी अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? याबाबत पोलीस यंत्रणा व आरटीओेचे लक्ष याबाबतीत दिसून येत नाही. मिनिडोअर संघटनेनेदेखील या विषयावर लक्ष टाकेल का? असा सवाल नागरिक करीत आहेत.