मिनी ट्रकच्या धडकेत महिला ठार

0

एरंडोल येथे झालेल्या अपघातात मुलगा गंभीर जखमी; चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

एरंडोल । एरंडोल गावातुन पारोळ्याकडे भरधाव वेगाने जाणार्‍या मिनी ट्रकच्या समोर चालत असलेल्या मोटार सायकलला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात तीस वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. यात तिचा 9 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असुन त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यास जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघात आज सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास एरंडोलपासून सुमारे दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या पळासदड फाट्याजवळ झाला आहे. पोलिसांनी मिनी ट्रक चालकास अटक केली आहे. तर यावल तालुक्यातील यावलकडून विरावलीकडे जात असलेली अ‍ॅपे रिक्षा रस्याच्या कडेस उलटल्याने 8 महीला जखमी झाल्या असून त्यातील चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. तर दुसरी घटना तालुक्यातील बामनोद-भालोद रस्यावर समोरासमोर झालेल्या दोन रिक्षाच्या धडकेत 4 जण जखमी झाले आहेत.

घटनास्थळी बाजाराचा सामान अस्तव्यस्त
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, पंकज सुभाष मराठे (वय 36) राहणार भालगाव ता.एरंडोल हे आपली मोटार सायकल क्र.(एमएच 19 एक्स 3279)ने मुसळी येथुन आपली पत्नी व लहान मुलासोबत सासरवाडी वरुन भालगाव येथे येत होते तर एरंडोलपासून दीड किलो मिटर अंतरावर असलेल्या पळासदड फाट्याजवळ मागुन येणारी मिनी ट्रक क्र.(एम.एच.28,9802)ने मोटार सायकलला धडक दिली. या धडकेत ज्योती पंकज मराठे (वय 30) रा. भालगाव ही विवाहिता जागीच ठार झाली. तर तिचा मुलगा तुषार पंकज मराठे (वय 9 वर्ष)हा गंभीर जखमी झाला. तर पती पंकज सुभाष मराठे (वय 36)हा जखमी झाला. अपघातात मयत झालेली विवाहिता ही पती व मुलासह आपल्या माहेरहून सासरवाडीला जात असतांनाच काळाने त्यांचेवर झडप घातली. आज एरंडोल येथील आठवडे बाजार असल्यामुळे त्यांनी भाजीपाला तसेच घरी असलेल्या 6 वर्ष वयाच्या लहान मुलीसाठी त्यांनी खाऊची देखील खरेदी केली होती. सदर साहित्य अपघातस्थळी अस्ताव्यस्त पडले होते.