भुसावळ । शहरातील शारदा नगरातील संत ज्ञानेश्वर उद्यानाजवळ आमदार संजय सावकारे यांच्या निधीतून मिनी हायमस्ट दिव्याचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. जेष्ठ नागरिक बी.के. पाटील, श्रीराम पाटील, दिनकर चौधरी, प्रमोद जावळे आदींच्या हस्ते या हायमस्टचे लोकार्पण झाले.
यावेळी नगरसेविका प्रितमा गिरीष महाजन, लक्ष्मी रमेश मकासरे, प्रमोद नेमाडे, अमोल इंगळे, गिरीष महाजन, प्रविण जंगले, विलास चौधरी, सुनील फालक, संदीप चौधरी, शितल चौधरी, शंभु चौधरी, सुहास महाजन, राहूल चौधरी आदी उपस्थित होते.