जळगाव । शहरात शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 126 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी 10 जणांचे मोबाइल आणि काहींची पाकीट लंपास केली. तर मिरवणुकीत परवानगी नसताना डिजे वाजविल्याने 9 जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी डॉ. आंबेडकर जयंती असल्याने भिलपुरा पोलिस चौकी ते नेहरू चौक, अजिंठा चौफुली ते नेहरू चौक, ईच्छादेवी चौक ते नेहरू चौक आणि जिल्हा क्रिडा संकूल ते नेहरू चौकापर्यंत मिरवणुकांची गर्दी होती. रात्री 8 ते 12 वाजेपर्यंत रस्त्यांवर दुतर्फा गर्दी होती. त्याचाच फायदा चोरट्यांनी घेतला. दरम्यान, याबाबत पोलिसात नोंद आहे.
यांचे मोबाईल चोरी..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात शहरात अनेक ठिकाणी मिरवणुका होत्या. त्यात टॉवर चौक ते नेहरू चौक आणि कोर्ट चौक ते रेल्वे स्थानका पर्यंत भिम सैनिकांची गर्दी होती. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी कुमूद भरत जाधव (वय 38, रा. जुने जळगाव), रवींद्र नथू जाधव (वय 21, सिद्धीविनायक पार्क), अजय संजय गवळी (वय 18, रा. प्रजापतनगर), अजय लक्ष्मण गरूड (वय 19, रा. सुरेशदादा जैन नगर), संजय कृष्णा सोनवणे (वय 21, रा. गेंदालालमील), मोहम्मद हनीफ कादीर भाई (वय 26, रा. अकोला), दीपक सुनील इंधाटे (वय 18, रा. गेंदालालमील), अनिकेत रविकांत भालेराव (वय 26, रा. राजारामनगर), देविदास अशोक सोनवणे (वय 18, रा. गेंदालालमील), धर्मकांत सिद्धांत भालेराव (वय 25, रा. कासमवाडी) यांचे मोबाइल लंपास केले.
डीजे वाजविणार्यांवर कारवाई…
आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरणुकीत डी.जे.वाजवून ध्वनी प्रदुषण व सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केल्याने नऊ जणांविरुध्द शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शनी पेठ पोलिसांनीही डी.जे.जप्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन व पोलिसांच्या सूचनांची दखल न घेणार्यांविरुध्द ही कारवाई झालेली आहे. पोलिस कर्मचारी मनोज सुभाष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील काशिनाथ दहेडे, अशोक दोधू तायडे, दत्तात्रेय भावडू तायडे, राजू कालीदास सोनवणे, हेमंत शिराळे, विनोद प्रभाकर सपकाळे (सर्व रा. गेंदालालमील) तर डिजे मालक वासूदेव पंडीत सोनार (रा. रामानंदनगर), मंगेश पाटील (धुळे) आणि डिजे ऑपरेटर योगेंद्र निकम (रा. धुळे) यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, शनिपेठ पोलिस ठाण्यात देखील डिजे जप्त करण्यात आला असून चालकाविरूध्द कारवाई करण्यात आली आहे.