किन्हवली । गणेश विसर्जन किंवा अन्य मिरवणुकीत डीजे अथवा डॉल्बी लावल्यास सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी अथवा वैयक्तिक स्वरूपाचे गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे किन्हवलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांनी पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत सांगितले. डीजेच्या कर्कश आवाजामुळे ध्वनीप्रदूषण होते. तसेच माणसाच्या शरीरावर घातक दुष्परिणाम होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी आणली आहे.
किन्हवली पोलीस ठाण्याच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ग्रामस्थ व पोलीस पाटील यांना डीजे व डॉल्बी ध्वनीमापक यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. मिरवणुकीत डॉल्बी लावल्यास गुन्हे दाखल होणार असल्याच्या या निर्णयामुळे डीजे चालक अस्वस्थ झाले असून भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.