चारजणांविरूद्ध गुन्हा दाखल
पिंपरी : मिरवणुकीत नाचू न दिल्याच्या कारणावरून पिंपरीत एकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. विकी महादेव गायकवाड (वय 25, रा. बौद्ध नगर, रिव्हर रोड, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री महापुरुषांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत डीजेच्या रॉकवर चढून नाचण्यासाठी आरोपींना विकी यांनी मज्जाव केला. याचा राग मनात धरून चार आरोपींनी बौध्दनगर येथील पाच दुचाकींची तोडफोड केली. तसेच अरुण अर्जुन वाघमोडे यांना मारहाण केली. त्यांच्या खिशातून जबरदस्तीने 2 हजार 200 रुपये काढून घेतले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. सहाय्यक पोलिस निरीक्षक ठुबल तपास करीत आहेत.
अन्य एका घटनेत 19 वर्षीय तरुणाला पूर्वीच्या भांडणाच्या रागातून चौघांनी मारहाण केली. याबाबत पीडित तरुणाची आई सुनीता सूर्यवंशी (वय 34, रा. पिंपरी, पुणे) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पिंपरी पोलिस ठाण्यात अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात जबरदस्तीने घुसून घरातील टीव्ही, कपाट, पाण्याचा ड्रमयांसारख्या वस्तूंची तोडफोड केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक मुंढे तपास करीत आहेत