मिरवणूकीत खुली तलवार फिरविणार्‍यावर गुन्हा दाखल

0

शिरपूर। शिरपूर शहरात क्रांतीसूर्य महाराणा प्रताप जयंती दिनी काढण्यात आलेल्या मिरवणूकीत खुली तलवार फिरविणार्‍या एका तरूणावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. शनिवारी शिरपूर शहरात क्रांतीसूर्य महाराणा प्रताप जयंती दिनाचे औचित्यसाधून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती.

ही मिरवणूक सायंकाळी शहरातील पाच कंदिल चौकात पोहोचली असता तालुक्यातील आमोदे येथील अंकीत एकनाथसिंग देशमुख हा हातात खुली तलवार घेवून नाचत होता. ही बाब बंदोबस्तात असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आली. याबाबत पो.का.रमेश राजाराम माळी यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अंकित देशमुख याच्याविरोधाते गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पो. नि. वाघ करीत आहेत.