मिलान कल्बने शेलार संघाला चकवले

0

मुंबई । मिलान क्लबने पिछाडीवरुन मुसंडी मारत बोरीवली प्रिमीअर लीग फुटबॉल स्पर्धेत शेलार फुटबॉल क्लबवर 2-1 असा विजय मिळवला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना प्रसाद सारंगने 6 व्या मिनिटालाच शेलार फुटबॉल क्लबला आघाडी मिळवून दिली होती. मिलानच्या नरेंद्र वाकरेने 20 व्या मिनीटाला गोल करत संघाला बरोबरी साधून दिली.

रोनक पटेलचा गोल निर्णायक
या बरोबरीनंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी आक्रमक खेळ करत आघाडी मिळवण्याचा प्रयत्न केला. शेवटी रोनक पटेलने 60 व्या मिनीटाला मिलान क्लबसाठी निर्णायक गोल नोंदवला. फायर ड्रेगॉन आणि टायगर स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. प्राकिथ शेट्टीने 53 व्या मिनिटाला टायगर स्पोर्ट्स फाऊंडेशन आघाडी मिळवून दिली.