मुंबई – मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची बुधवारी म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली.
अहमदनगरचे महापालिका आयुक्त डी. बी. गवादे यांची नाशिकचे अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून तर नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. सी. मंगले यांची अहमदनगरचे महापालिका आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रतीक्षेत असलेले व्ही. व्ही. माने यांची अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवदे यांची नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.