मिलिंद सोमण-अंकिता कोनवार लग्नबंधनात

0

अलिबाग : दोन महिन्यांपासून अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची प्रेयसी अंकिता कोनवार यांच्या लग्नाची चर्चा होती. अखेर दोघांनी रविवारी अलिबागमध्ये लग्न केले. शनिवारी या दोघांचा हळदीचा आणि मेहंदीचा कार्यक्रम पार पडला होता. मिलिंदने लग्नसोहळा अत्यंत साधेपणाने करण्याचे ठरवले होते. त्यानुसार लग्नसमारंभासाठी त्याने निवडक मित्र आणि कुटुंबीयांना आमंत्रित केले होते. जवळच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त मिलिंदच्या सामाजिक कामात जे मित्र सहकार्य करतात, तसेच जे त्याच्या फिटनेसचे चाहते आहेत, अशांनाच आमंत्रण दिले होते. त्यापैकी बरेच आमंत्रित शनिवारी अलिबागमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या उपस्थितीत रविवारी मिलिंद आणि अंकिताचा लग्नसोहळा पार पडला.