मिल्लत हायस्कुलमध्ये फुटबॉल स्पर्धा उत्साहात

0

जळगाव। मेहरुण परिसरातील मिल्लत हायस्कुल येथे फुटबॉल स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथि म्हणून तहसीलदार अमोल निकम, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सुनील कुर्‍हाडे, सुनंदा पाटिल, नगरसेवक प्रशांत नाईक,प्रा. डॉ. अनिता कोल्हे, फारूख शेख, मुश्ताक सर, डॉ. इबाल शहा आदींची उपस्थिती होती. स्पर्धांच्या सुरूवातीस तहसीलदार अमोल निकम यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.

मिल्लत हायस्कुल, इकरा विद्यालय, के.के. अलफैज हायस्कुल तसेच मनपा शाळा क्रं. 36,56,11, व मनपा माध्य उर्दू शाला मेहरून यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. मनपा शाळा क्रं. 36/56 विजयी तर मिल्लत उपविजयी व तृतीय एंग्लो उर्दू ठरली. स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणूनचा बहुमान मनपाचीयास्मीन अब्दुल सलीम व मिल्लत हायस्कुलची अलशिफा शेख गफ्फार हिला मिळाला. त्यांना रोख बक्षीस व मेडल देवून गौरविण्यात आले.