जळगाव। या वर्षी भारतात 17 वर्षाखालील मुलांचे फुटबाल वर्ल्डकप आयोजित करण्यात आले असून फुटबालच्या प्रचार व प्रसारासाठी, तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी फुटबालचे चाहते व्हावे ह्या उद्देशाने महाराष्ट्र शासनातर्फे अवघा महाराष्ट्र फुटबालमय हे अभियान हाती घेतले आहे. त्या निमित्त उर्दू माध्यमांतील मुलींसाठी फुटबाल स्पर्धेचे जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून आयोजन मिल्लत हायस्कूलमध्ये करण्यात आले होते.
सदर स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे विशेष सहकार्य लाभले. उद्घाटनपर झालेल्या दर्शनी सामन्यात तहसीलदार अमोल निकम, एम,आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील कुर्हाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, बेंडाळे महिला विद्यालयाच्या अनिता कोल्हे, पिंच बॉटलिंगचे जाफर शेख,जैन स्पोर्ट्सचे फारूक शेख, समाजसेवक प्रशांत नाईक, माजी उपप्राचार्य डॉ.इक्बाल शाह, मिल्लत हायस्कूलचे मुख्याध्यापक मुश्ताक शेख, पर्यवेक्षक अब्दुल कय्युम शाह, क्रीडाप्रमुख ताजोद्दिन शेख, क्रीडाशिक्षक सैयद मुख्तार आदींनी फुटबाल खेळत स्पर्धेचा आंनद लुटला.
या शाळांचा सहभाग
यावेळी मनपा शाळा क्रमांक 36, अल्फैज उर्दू हायस्कूल, के,के उर्दू मुलींची शाळा, अॅग्लोे उर्दू हायस्कूल, मनपा शाळा क्रमांक 11, मिल्लत हायस्कूल आणि मनपा शाळा क्रमांक 56 या शाळेतील मुलींच्या संघांनी सहभाग नोंदविला होता. यात मनपा शाळा क्रमांक 36 चा संघ विजयी तर मिल्लत हायस्कूलचा संघ उपविजयी झाले. यास्मिन बानो अब्दुल सलीम उत्कृष्ट फुटबालपटू, अल्शिफा अब्दुल गफ्फार हिला उत्कृष्ट गोलकीपरचा पारितोषिक देण्यात आला.