पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मिळकतीमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविणे, स्पर्धा परीक्षा केंद्रे अद्ययावत करणे, पडून असलेल्या भंगार साहित्याची विल्हेवाट लावणे अशा विविध कामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिकार्यांना दिल्या. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या मिळकती, उद्याने, क्रीडांगणे, व्यायामशाळा, सांस्कृतिक हॉल, बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, जलतरण तलाव, कुस्ती केंद्र यांना महापौर जाधव यांनी भेटी दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी शनिवारी आठही प्रभाग अध्यक्ष, क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता यांची बैठक घेतली. आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभाग अध्यक्ष अनुराधा गोरखे, भीमा फुगे, कमल घोलप, करुणा चिंचवडे, अंबरनाथ कांबळे, नगरसदस्य बाळासाहेब ओव्हाळ, सर्व प्रभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, नगररचना, उद्यान, क्रीडा, भूमि जिंदगी, आरोग्य विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
हे देखील वाचा
मिळकतींना सुरक्षा व्यवस्था पुरविणे
महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविणे, स्पर्धा परीक्षा केंद्रे अद्ययावत करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतुदी करणे, महापालिकेच्या मिळकतीमध्ये नादुरूस्त, खराब पडून असलेले भंगार साहित्य तातडीने उचलून त्या भंगार साहित्याची विल्हेवाट लावणे, सर्व मिळकतींना वॉल कंपाऊंट/ तारकुंपन करणे व त्यासाठी बजेटमध्ये तरतुद करण्यात यावी. महापालिकेच्या आरक्षित जागेचे डिमार्केशन करणे, गणेश तलावातील गाळ काढणे व त्या ठिकाणी दरवर्षी गाळ साचला जातो त्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करणे, क्रीडांगणे विकसित करणे, लाईटची व्यवस्था करणे, सिंथॅटिक कोर्ट तयार करणे, स्वच्छता मोहिमे अंतर्गत वॉर्डात स्वच्छता राखणे, शहरातील नादुरूस्त फुटपाथ व चेंबर दुरूस्त करणे, दररोज साफसफाई करणे, राडारोडा नियमित उचलणे, उद्यानातील झाडांना मैला शुध्दीकरण केंद्रातील स्वच्छ केलेले पाणी कायमस्वरुपी वापरणेबाबत उपाययोजना करावी. व्यायामशाळेला आवश्यक साहित्य पुरविणे, ज्या व्यायामशाळा खासगी संस्थाना चालविण्यास दिलेल्या आहेत. त्या व्यवस्थित चालवित नसतील तर त्या व्यायामशाळा महापालिकेने पुन्हा ताब्यात घ्याव्यात. शहरातील बंमोटर अभावी बंद असलेल्या बोअरवेल तातडीने सुरू कराव्यात, महापालिकेच्या सर्व मिळकतींना सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या.