मिशन इंद्रधनुष्य, प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंर्तगत लसीकरण मोहीम

0

आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते उद्घाटन;लसीकरणासाठी मनपातर्फे आवाहन

जळगाव-बालक आणि गरोदर मातेला लसीकरण करण्यासाठी मिशन इंद्रधनुष्य , प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंर्तगत लसीकरण मोहीमेचे उद्घाटन महानगरपालिकेच्या कै.दादासाहेब भिकमचंद जैन रुग्णालयात आमदार राजूमामा भोळे यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर सीमताई भोळे ,उपमहापौर अश्विन सोनवणे,आयुक्त डॉ.उदय टेकाडे,स्थायी समिती सभापती अँड.शुुचिता हाडा, महिला बाल कल्याण सभापती शोभाताई बारी,उपायुक्त मिनीनाथ दंडवते, दवाखाना नियंत्रण समिती सभापती डॉ. विश्वनाथ खडके,सदस्य डॉ.चंद्रशेखर पाटील,महेश चौधरी,कांचनताई सोनवणे,असिस्टंट डायरेक्टर डॉ. पतनशेट्टी ,स्त्रीरोग तज्ञ डॉ.तिलोत्तमा गाजरे उपस्थित होते.

गरोदर मातेला मिळणार अनुदान

प्रधानमंत्री मातृ वंदन योजने अतंर्गत गरोदर स्त्रीला 5 हजार रुपयाचा टप्या टप्याने लाभ दिला जातो ,गरोदर पणाच्या पाहिल्या शंभर दिवसायाच्या आत नोदंणी केल्यास एक हजार रुपये,गरोदरपणाचे सहाव्या माहिन्यानंतर तपासणी केल्यास दोन हजार रुपये व प्रसुती नंतर बाळाला साडे तीन महिन्यापर्यंत सर्व लसी दिल्यास दोन हजार रुपये अशा प्रकारे पाच हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो.कागद पत्रांची पुर्तता केल्यास ही रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

मोफत लसीकरण

विषेश मिशन इंद्रधनुष्य योजने अंतर्गत 0-2 वर्ष वयोगटातले बालक ज्यांचे लसीकरण काही कारणस्तव राहून गेलेले आहे किंवा ज्या बालकांनी अर्धवट लसी घेतले आहेत त्यांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे ,ही योजना डिसेंबर,जानेवारी,फेब्रुवारी व मार्च महिन्याचा पाहिला आठवडयात राबविली जाणार आहे तरी या दोन्ही योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाडे यांनी केले आहे. प्रास्ताविक प्रमुख वैद्यकिय अधिकारी डॉ.राम रावलानी यांनी केले. यशस्वितेसाठी डॉ. शिरीष ठुसे,डॉ. नेहा भारंबे,डॉ. मनीषा उगले,डॉ. संजय पाटील व डॉ. सायली पवार यांनी परिश्रम घेतले.