नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत इस्रोचे ‘मिशन गगनयान’साठी १० हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या मिशन अंतर्गत तीन सदस्य सात दिवसांसाठी अंतराळात वास्तव्य करणार आहेत.
मंजुरी मिळाल्यानंतर ४० महिन्यांच्या आत ही योजना लाँच करण्यात येईल. आज जगभरातील अन्य देश उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यासाठी इस्त्रोची मदत घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षीच ‘मिशन गगनयान’ची घोषणा केली होती. हे मिशन २०२२ पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मदतीसाठी भारतानं रशिया आणि फ्रान्ससोबत करार केला आहे.