मिशन विद्यालयातील चिमुकलीचा स्तुत्य उपक्रम

0

नंदुरबार। ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे!” ही ओवी साथकी ठरवित एस.ए.मिशन के.जी.स्कुलच्या 5 वर्षाच्या चिमुकलीने तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्वयंस्फुर्तीने वर्गमित्र व शिक्षकांना रोपांचे वाटप करुन वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करण्याचा संदेश दिला. शासनाच्या उद्दीष्ठाला हातभार लावून खारीचा वाटा उचललेला आहे, तो एस.ए.मिशन विद्यालयातील सिनिअर के.जी.स्कुलच्या वर्गात शिकत असलेल्या 5 वर्षीय प्राप्ती पटेल या चिमुकलीने.

वृक्ष लागवडीसाठी वर्गमित्रांच्या आई-बाबांना दिले संदेशपत्र
नंदुरबारातील विमलविहार कॉलनीतील धर्मेंद्र पटेल व सिमा पटेल यांच्या चिमुकल्या प्राप्तीने तिच्या वाढदिवसानिमित्त वर्गमित्रांना रोपांचे वाटप केले. व वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. यासोबत प्राप्तीने वृक्ष लागवडीसाठी वर्गमित्रांच्या आई-बाबांना संदेशपत्रात वृक्षांची आपले सर्वस्व देण्याची वृत्ती, त्यागाचा उल्लेख करीत वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला आहे. वनविभागाच्या सहकार्याने प्राप्तीने वाटप केलेल्या वृक्षांमध्ये सिताफळ, आवळा, निलगिरी, रामफळ, कडूलिंब, औंदुबराचा समावेश आहे. चिमुकल्या असणार्‍या प्राप्तीने राबविलेला उपक्रम स्तुत्य असून एस.ए.मिशन विद्यालयाचे मुख्याध्यापक (इनचार्ज) एस.एच.यंगड, उपशिक्षक एस.रघुवंशी, एम.सोनेरी, के.गंगावणे, एस.मन्सुरी, जी.वळवी, आर.पाडवी, आर.वळवी, आजाधव, एन.साहित्या, के.संगतरामानी, डी.दुसेजा, ई.एलीस, बी.पाटील यांनी कौतुक केले आहे.