भुसावळ । रेल्वेचे जंक्शन असलेल्या भुसावळ शहरात हरविलेल्या व्यक्तिंचा शोध घेण्यासाठी येणार्यांचे प्रमाण अधिक आहे. राज्यासह देशभरातून नागरीक हरविलेल्या व्यक्तिंचा शोध घेण्यासाठी येतात. तेव्हा त्यांची दमछाक होते. या कुटुंबियांना मदत करण्यासाठी शहरात सामजिक कार्यकर्त्या रुपाली सुर्यवंशी यांनी मिसिंग सेेंटरची स्थापना केली आहे. या मोहिमेत विविध घटकातील सहभाग व त्यांची संमती तयार करण्याचे काम सुरु आहे. यात नुकतेच होमगार्ड व रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या कुलीबांधवांची समिती गठीत करण्यात आली.
कुली बांधवांमध्ये अध्यक्ष म्हणून अनिल सावळे तर उपाध्यक्ष म्हणून तारिकउल रहेमान यांची तर होमगार्ड पथकात अध्यक्ष सुरेश इंगळे व उपाध्यक्ष विद्या लोखंडे यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून राहुल फुले, शेख नईम शेख इस्माईल, नासिर इस्माईल, वसिम शेख, हेमंत जाधव, शेख गुलाम दस्तगिर, रफिक गवळी, मोहसिन पटेल, हमिद अली, रविंद्र खरात, विष्णू सोनवणे, शेख फिरोज, होमगार्ड पथकात अनिल बोरवले, किशोर चावरिया, दिपक पवार, राहुल सपकाळे, अजय सुरवाडे, अख्तरअली सैय्यद, सुरेखा मोरे, लता हिरे, प्रज्ञा संथ, दुलिचंद तायडे यांचा समावेश आहे.