जळगाव । येथील आयएनआयएफडी संस्थेत बॉलिवूड मिस्टर अॅन्ड मिस इंडिया 2018 सिजन टु चे लाँचिंग सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या प्रकल्पात खान्देशातील वयोगट 16 ते 32 मधील युवक व युवतींना संधी मिळणार आहे. याप्रसंगी ऍक्टर आणि फिल्म फायनान्सर यश अहलावत, आयएनआयएफडीच्या संचालिका संगिता पाटील, न्यु दिल्ली येथील फॅशन डिझायनर राशी वर्मा यांच्यासह विद्यार्थी कर्मचारीवर्ग उपस्थित होते. नुकतेच 24 जून रोजी स्टुडिओ 19 फिल्मस याअंतर्गत बॉलिवूड मिस्टर अॅन्ड मिस इंडिया 2017 चे आयोजन न्यु दिल्ली येथील पंचतारांकित, क्राऊन प्लाझा येथे पहिले बॉलिवूड मिस्टर अॅन्ड मिस इंडिया 2017 चे आयोजन करण्यात आले होते.
यांची असणार उपस्थिती
या कार्यक्रमाला बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अरबाज खान, महिमा चौधरी, सना खान, रजनिश दुग्गल, यश अहलावत, टीव्ही अभिनेत्री देविना बॅनर्जी, क्लाऊडिया सिझलर, सिमरन कौर उपस्थित होते. संस्थेच्या संचालिका संगिता पाटील यांनी असाच कार्यक्रम खान्देशातील जळगावात होण्याचा आग्रह यश अहलावत यांच्याकडे केला. खान्देशातील विद्यार्थ्यांना याद्वारे संधी मिळावी यासाठी त्यांना आयएनआयएफडी सहकार्य करेल. हा निश्चय पाहून यश अहलावत यांनी सिजन टु चे लाँचिंग सोहळा होण्यासाठी होकार दिला. त्यामुळे बॉलिवूड मिस्टर अॅन्ड मिस इंडिया 2018 चे आयोजन जळगावात होण्यावर शिक्कामोर्तब झाला असून त्याचा लाँचिंग सोहळा नुकताच जळगावात यश अहलावत यांच्या उपस्थितीत थाटात झाला. खान्देशातील युवक, युवतींना अनेक संधी या क्षेत्रात उपलब्ध व्हाव्यात असाच प्रयत्न संगिता पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.