जळगाव: मिस मल्टीनॅशनल 2019 स्पर्धेत भारताला सन्मान मिळवून देणं हेच माझे उदिष्ट आहे.आणि या स्पर्धेत यश मिळविणारच असा विश्वास मिस इंडिया मल्टीनॅशनलची विजेता तन्वी मल्हारा हिने संवाद साधताना व्यक्त केला.भारताचे प्रतिनिधीत्व करताना आनंद होत असला तरी आव्हान आणि खूप मोठी जबाबदारी असल्याचेही ती म्हणाली.यावेळी तन्वीचे वडिल आनंद मल्हारा आणि आई डॉ.नलिनी मल्हारा उपस्थित होते.
कौशल्य गुण हेच खर्या अर्थाने सौंदर्य
बालपणापासूनच कॅमेर्याचे खूप आकर्षण आणि पॅशन आहे.ब्युटी आणि फॅशनचे स्वप्न बालपणापासूनच पाहिले असून त्यासाठी आई-वडिलांचे प्रोत्साहन मिळाले आहे.आपल्यातील कौशल्य गुण हेच खर्या अर्थाने सौंदर्य असल्याचे तन्वीने यावेळी सांगितले.जेव्हाही माझ्या शब्दांनी,माझ्या आवाजाने लोकांना हसविते,त्यांच्या चेहर्यावर आनंद फुलविते तेव्हा मी सुंदर असल्याची जाणीव होते. प्रत्येक क्षेत्रात करिअर करतांना संघर्ष आणि मेहनत आहेच. या वर्षी मिस इंडियासाठी प्रयत्न केला.मिस अर्थसाठी प्रयत्न केला.अंतिम रांऊड पर्यंत गेले परंतु जिंकू शकले नाही.पण पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागली आणि मिस इंडिया मल्टीनॅशनलच्या स्पर्धेत यशस्वी झाली.आता डिसेंबरमध्ये होणार्या मिस मल्टीनॅशनल 2019 स्पर्धेत भारताला सन्मान मिळवून देणार असा आशावाद तन्वी हिने व्यक्त केला.