मुंबई : मिहान येथील प्रकल्पातील गुंतवणुकीबाबतच्या प्राथमिक बैठकीचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले होते . नागपूर येथील मिहान प्रकल्प हा औषध उत्पादक कंपन्यांसाठी अनुकूल असून या प्रकल्पात औषध उत्पादक कंपन्यांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी येथे केले. औषध उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत . यावेळी श्री. येरावार बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त डॅा. हर्षदीप कांबळे, राज्यभरातील सुमारे 60 विविध औषध निर्माण कंपन्यांचे मालक, प्रतिनिधी उपस्थित होते.
नागपुरात गुंतवणूकीसाठी इच्छूक कंपन्यांनी नव्याने औषध उत्पादन सुरू करावे किंवा आपल्या कंपनीची विस्तारित शाखा सुरू करावे. या निर्मिती कार्यात अडथळे आल्यास चर्चेअंती दूर करण्यात येतील .औषध उत्पादन क्षेत्राचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत परिषदेचे आयोजन करण्यात येईल, असे ना. मदन येरावार यावेळी म्हणाले.