भुसावळ : महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाद्वारे 14 वी शासकीय बालनाट्य स्पर्धा संपन्न झाली. नाशिक विभाग स्तरावर जळगाव येथे 29 तर नाशिक येथे 19 नाटके सादर करण्यात आली. त्यात शारदा माध्यमिक विद्यालय, दिपनगर शाळेचे नाटक मीनू कुठे गेला प्रथम क्रमांकाने विजयी झाले. 14 रोजी महाराष्ट्र राज्य,सांस्कृ तिक विभागाद्वारे निकाल घोषित करण्यात आला. ग्रामीण भागातून प्रथमच प्रवेश करून अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत दिपनगर विद्यालयाने विभाग स्तरावर उंच भरारी मारलेली आहे.
सर्व स्तरातून अभिनंदन
समिर तडवी लिखीत तथा दिग्दर्शीत नाटीका मीनू कुठे गेला, सदर नाटकाची प्रस्तुत निर्मिती मुख्याध्यापक एस. एस. जंगले व एस. के. भटकर यांनी केलेली असून याच नाटकातील अभिनयास प्रमाणपत्र पात्र ठरणारा विद्यार्थी विजय उमक हा मुख्य पात्र होता. शारदा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आर.एन.गाजरे व मानद सचिव व्ही.पी.राणे यांनी सहर्ष अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातून प्रथमच उंच भरारी मारल्याने सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.