मीरा-भाईंदरचा विजय

0

मीरा-भाईंदर महानगरपालिकेत अपेक्षेप्रमाणे भाजपाने बाजी मारली आहे. 95 जागांच्या महानगर पालिकेत 61 जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. शिवसेना जेमतेम 22 जागांपर्यंत मजल मारु शकली. ही महानगरपालिका जिंकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील पूर्ण पक्ष कामाला लावला होता. साम-दाम-दंड-भेड या मार्गाने ही निवडणूक लढवली. शिवसेनेच्या प्रताप सरनाईक या एकांड्या शिलेदाराने झुंझ दिली. त्यांना गिल्बर्ट मेंडोसांची साथ नसली तर शिवसेना 22 जागांपर्यंत मजल मारु शकली नसती.

ही निवडणूक केवळ प्रांतीयवादावर लढवली गेली. येथील भाजप आमदार नरेंद्र मेहता हे राजस्थानी जैन आहेत. राजस्थान मधील जैन समाज, गुजरात मधील जैन आणि अन्य अमराठी मतदार सुमारे 60 टक्कयांच्या पुढे मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत वास्तव्याला आहे. अमराठी हिंदू पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता, तो आता पूर्णपणे भाजपाकडे गेला आहे. त्याचा फायदा या निवडणुकीत भाजपाला झाला.

गेल्या निवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती. मात्र या निवडणुकीत माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत भोपळाही फोडता आलेला नाही. गिल्बर्ट मेंडोसा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हेच मेंडोसा भाजपाच्या दारीही प्रवेशासाठी गेले होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदमरा नरेंद्र मेहता यांना विचारले. त्यावेळी मेहता यांनी सांगितले की मेंडोसांची गरज नाही. या निवडणूकीत भाजपाला सहज विजय मिळेल त्याप्रमाणे नरेंद्र महता यांनी आपला शब्द खरा करून दाखवला. हितेंद्र ठाकूर यांच्या बहूजन विकास आघाडीने आणि मनसेलाही या निवडणुकीत भोपळा फोडता आलेला नाही. गेल्या वेळी बहुजन विकास आघाडीचे राजू भोईर आणि भावना भोईर हे पती-पत्नी निवडून आले.

काँग्रेसने मात्र मुस्लमी बहुजन भागात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मुजप्पर हुसेन यांनी एकाकी लढत देत आपले दहा नगरसेवक निवडून आणले आहेत. मीरा-भाईंदरच्या मुस्लीम जनतेने ठामपणे काँग्रेसला साथ दिली.खासदार कपिल पाटील आण अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण मीरा-भायंदरमध्ये ठाण मांडून होते. मुंबईच्या एका आमदाराला एक वार्ड या पद्धतीने जबाबदारी देण्यात आली होती. उत्तर भारतीय महासंघाचे संस्थापक आमदार आर.एन.सिंग आणि महिला बालकल्यण मंत्री विद्या ठाकूर यांना उत्तर भारतीय मतदारांची जबाबदारी देण्यात आली होती.

केंद्रीय मंत्र्यांच्या सभा प्रत्येक प्रांतानुसार लावण्यात आल्या होत्या. राजस्थानचे असलेले केंद्रीय मंत्री यांना मारवाडी बहुल भागात, उत्तर प्रदेशातील असलेल्या केंद्रीय मंत्र्यांना उत्तर भारतीय असलेल्या भागात तर सिहारमधील केंद्रीय मंत्र्यांना बिहारी बहुजन भागात जारी सभा घेतल्या. अमराठी हिंदूंना शिवसेना-मनसेची भीती दाखवली की लगेच सत्ताधारी पक्षाकडे आकर्षित होतात. याचा बर्‍यापैकी फायदा भाजपाला झाला. गिल्बर्ट मेंडोसा यांचा प्रभाव असलेल्या भागात शिवसेनेला चांगली साथ मिळाली. त्यामुळेच त्यांनी 22 पर्यंत मजल मारली. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना 60 पेक्षा जास्त जागा येतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तर भाजपाला 55 नगरसेवक येतील अशी खात्री होती. त्यांना 61 जागा मिळाल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस दोन अंकी आकडा गाठू शकणार नाहीत, असे अंदाज होते पण काँग्रेसणे 10 नगरसेवक निवडून आणून बर्‍यापैकी यश मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तर नेतृत्वहीन झाली होती. मेंडोसा गेल्यामुळे त्यांच्याकडे नेतृत्वत नव्हते. माजी खासदार संजीव नाईक नवी मुंबईहून ही निवडणूक ऑपरेट करत होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था दयनीय झाली होती. या निवडणुकीत नरेंद्र मेहता यांनी मात्र आपले या महानगरावरील वर्चस्व सिद्ध केले आहे. अपक्ष नगरसेवक, महापौर, आमदार अशी त्यांच्या यशाची चढती कमान आहे. गिल्बर्ट मेंडोसा यांच्या दहशतवादा विरोधात उभे राहून त्यांनी येथे टिकून दाखवले. महापौर झाल्यापासून मेंडोंसा आणि त्यांचे गुंड नरेंद्र मेहता यांच्या मागावर होते पण याही परिस्थितीवर ते टिकून मेंडोसा यांच्याविरोधात उभे राहिले. मुख्यमंत्र्यांनी उभी केलेली सत्तेची ताकद पक्षसंघटनेचे पूर्ण पाठबळ आणि नरेंद्र मेहता यांची रणनीती या साथीने मीरी-भाईंदरमध्ये भाजपाला सत्ता मिळाली आहे.
नितीन सावंत- 9892514124