मीरा-भाईंदर पालिकेसाठी रविवारी मतदान

0

भाईंदर। मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी उद्या, रविवारी मतदान होत आहे. शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्येच वर्चस्वाची लढाई आहे. माजी आमदार गिल्बर्ट मेंन्डोसा हे शिवसेनेत गेल्यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस या निवडणुकीत दोन अंकी नगरसेवक निवडून आणू शकतील का, या विषयी शंका आहे. तर काँग्रेस पक्ष फक्त मुस्लिमबहुल भागापुरता मर्यादित आहे.

भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि शिवसेना आमदार प्रतास सरनाईक हे महापालिकेत बहुमत मिळवण्यासाठी झटत आहेत. राज्यात भाजपची सत्ता असल्याने आणि आमदार नरेंद्र मेहता हे भाजपचे असल्याने भाजप साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरून कोणत्याही परिस्थितीत बहुमत खेचून आणण्याच्या तयारीत आहे. गिल्बर्ट मेंन्डोसा यांच्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली असून आपण बहुमताचा आकडा सहज पार करू, असा विश्‍वास शिवसेनेला आहे. दरम्यान महापालिका प्रशासनानेही निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे.