मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ‘महाराष्ट्र विकास आघाडी’च्या सरकारचा शपथविधी सोहळा आज गुरुवारी शिवाजी पार्कवर पार पडला. यात मुख्यमंत्री म्हणून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनी वेगळ्या स्टाईलने शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आणि माझे आई वडीलांना स्मरून ‘मी उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशा शब्दात शपथ घेतली. महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत शपथ घेतली.
या शपथविधीला देशभरातील नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॉंग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, कपिल सिब्बल, चंद्रकांत पाटील, राज ठाकरे आदींसह राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते.