‘मी कांदा खात नाही मला चिंता नाही’; नेटकरी अर्थमंत्र्यांवर भडकले !

0

नवी दिल्ली: कांद्याच्या दराने उच्चांक गाठल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. कांद्याच्या वाढत्या दरावरून ससंदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये काल बुधवारी कांद्याच्या दरवाढीवर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कांद्याचे उत्पादन का घटले आणि त्याबद्दल काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत असा प्रश्न अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विचारला. त्यावर उत्तर देताना सीतारमन यांनी “मी जास्त कांदा, लसूण खात नाही त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. मी अशा कुटुंबातून आली आहे, ज्या ठिकाणी कांदा जास्त प्रमाणात खाल्ला जात नाही,” असे अजब स्पष्टीकरण दिले. सितारमन यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर अर्थमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

अर्थमंत्री म्हणून सीतारमन यांचे हे वक्तव्य संवेदनशून्य आणि सत्तेचा माज दर्शवत असणारे आहे अशी टीका होत आहे.

तुम्ही कांदा नाही अर्थव्यवस्था खाल्ली
सरकारमधील मंत्री कांदे खात नाही, मात्र त्यांनी अर्थव्यवस्था खाल्ली अशी टीका सोशल मीडियातून होत आहे. आज संसदेबाहेर विरोधकांनी कांद्यावरून सरकार विरोधात घोषणाबाजी केली.