श्रीवर्धन । श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे स्मारकासाठी मी मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे. मात्र या स्मारका संदर्भात माझ्या पत्रामुळेच बैठक बोलावली होती. आणि बाकीचे भाजपचे म्हणून त्यांना बोलावलं होत. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली. मात्र काही मंडळी या स्मारकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला श्रेय नको, पण जाणीवपूर्वक अपप्रचार करून श्रेय घेणार्यांना तटकरे यांनी फटकारले. यावेळी व्यासपीठावर युवा नेते अनिकेत तटकरे, महमद मेमन, दर्शन विचारे, नगराध्यक्ष नरेंद्र भुसाने, जितेंद्र सातनाक, जिल्हा प सदस्य प्रगती अदावडे, मंगेश कोमनाक आदी मान्यवर उपस्थित होते.
ही तर सत्तेत असताना केलेल्या चांगल्या कामांची पुण्याई
सत्ता नसताना सुद्धा आम्ही विकासाचा ध्यास घेतला आहे. सत्तेत असताना चांगली कामे केल्यामुळेच आम्ही पुन्हा पुन्हा निवडून येतो. मात्र खोटं श्रेय लाटण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही. काही मंडळी व्हाट्सअपवर खोटं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी किंवा मिटिंग घेण्यासाठी कोणत्या अधिकार्यांशी संपर्क साधला, यांचे उत्तर द्यावे.
श्रीवर्धनमध्ये होत असलेल्या दरोडा सत्रामुळे नागरिक त्रस्त होते. राज्याचे गृह खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे गावात दरोडे पडत होते. या विषयावर कोणी भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली का? त्यासाठी मीच सीसीटीव्हीचा प्रस्ताव मंजूर करून आणला व आज श्रीवर्धन शहरात सी सी टीव्ही बसत असून श्रीवर्धनमध्ये कोण दरोडे टाकतात व राजकीय देखील दरोडे कोण टाकतात हे निदर्शनास येईल श्रीवर्धनमधील श्रीमंत पेशवे स्मारक बनवणे हे माझे नैतिक काम आहे आणि ते मी करणारच असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.