नवी दिल्ली-कॉंग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘चौकीदार चोर है!’ म्हणून होत असलेल्या आरोपला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून ‘में भी चौकीदार’ मोहिम सुरु करण्यात आली. या मोहिमेत मोदी समर्थकांनी चांगली प्रतिसाद दिला. दरम्यान आज पंतप्रधान मोदींनी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममधून संवाद साधला. जवळपास पाच हजार नागरीक या कार्यक्रमाल उपस्थित होते. याच कार्यक्रमात मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अनेकांशी संवाद साधले. यावेळी त्यांनी मी जनतेच्या पैशाचा कधीही गैरवापर केला नाही, चौकीदार एक प्रेरणा, भावना आहे. आपण सर्व एकत्र राहिलो तर कोणीही भारताला लुटू शकत नाही असे मोदींनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांनी ज्यांनी देशाला लुटले त्यांना प्रत्येक पैसा परत करावा लागेल. २०१४ साली सत्ता मिळाली तेव्हा भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये ११ व्या स्थानावर होता आज भारत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे असेही मोदींनी यावेळी नमूद केले. भारतात दहशतवादी कारवाया सुरुच होत्या. त्यामुळे जिकडून दहशतवाद कंट्रोल होतो तिथेच हा खेळ खेळण्याचा मी निर्णय घेतला. बालकोटमध्ये कारवाई झाल्याचे मान्य केले तर तिथे दहशतवादी तळ होता हे पाकिस्तानला मान्य करावे लागेल असेही मोदींनी सांगितले. सैन्याचे सामर्थ्य आणि शिस्तीवर विश्वास असल्यामुळे मी बालकोटवर हल्ल्याचा निर्णय घेऊ शकलो बालाकोटचे श्रेय माझे नसून सैन्याचे आहे असेही मोदींनी यावेळी सांगितले.
काही जणांची बौद्धीक मर्यादा असते. त्यापलीकडे त्यांचा विचार जात नाहीत असे सांगत त्यांनी राहुल गांधींवर टीका केली.