मी झाकी पाकी करणारा आमदार नव्हे : दत्तात्रय भरणे

0

मागासवर्गीयांबद्दल कुणाचे प्रेम आहे त्याची नार्को चाचणी करा

इंदापूर : राज्यातील चालू अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांपेक्षा जास्त निधी इंदापूर तालुक्याला मी आणला आहे. तालुक्याच्या विकासाला निधी आणण्याचे काम ऐड्या गबाळ्याचे काम नाही. मी हार घालून फोटो काढणे आणि फोटोसेशेन करणे असा झाकी पाकीतला मी आमदार नाही असा टोला भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता आमदार दत्तात्रय भरणे लावला.

पुणे येथे 29 एप्रिलला भिम फेस्टिव्हल कार्यक्रम खासदार सुप्रिया सुळे यांनी आयोजित केला आहे. त्यासाठी इंदापूर विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी आमदार भरणे बोलत होते. . या बैठकीला इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे,सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जितेंद्र बडेकर,जेष्ठ नेते जयंत ठोकळे,बारामती लोकसभा संपर्क प्रमुख प्रविण शिंदे,राष्ट्रवादी इंदापूर तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील,नगरसेवक श्रीधर बाब्रस,आशोक मखरे,राष्ट्रवादी तालुका युवकाध्यक्ष सचीन सपकळ,राष्ट्रवादी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सागर मिसाळ,किसनराव जावळे व वसंतराव आरडे इत्यादी उपस्थित होते.

सावित्रीबार्ई फुलेंना भारतरत्न साठी जनतेचा पाठींबा
आमदार भरणे पुढे म्हणाले, कूणी कितिही झलक दाखविली तरी इंदापूर तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. त्यांना माहित आहे कोण कामाचा व कोण बिन कामाचा. खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत महात्मा जोतीबा फुले व सावित्रीबाई जोतीराव फुले यांना भारत सरकारने भारत रत्न पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी केली आहे. त्या ठरावाला इंदापूर तालुक्यातील जनतेचा पांठीबा असल्याचे भरणे यांनी जाहिर केली.

चळवळीतील कामाबद्दल सत्कार होणार
भिम फेस्टीवलमध्ये बारामती लोकसभा मतदार संघात समाविष्ट असणार्‍या प्रत्येक तालुक्यातील आंबेडकरी चळवळीत काम करणार्‍या एक महिला व एक पुरूष यांना पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

तर नार्कोचाचणी करा
इंदापूर तालुक्यातील मागासवर्गीयावर जास्त प्रेम करणारा व दलित वस्ती साठी जास्त निधी आणणारा इंदापूर तालुक्यातील कोण पुढारी आहे हे जर कळायचे आसेल तर पुढार्‍यांची नार्को चाचणी करण्याची मागणी आमदार भरणे यांनी केली.