मी देशभक्त कुटुंबातील, ३७० रद्दला माझा पाठींबा: भूपेंद्रसिंह हुड्डा

0

चंदिगड: केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केले आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. मात्र कॉंग्रेसकडून या निर्णयाला विरोध होत आहे. असे असले तरी कॉंग्रेसचे काही नेते या निर्णयाला पाठींबा देत आहे. आता कॉंग्रेसचे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी कलम ३७० रद्द करण्याला पाठींबा दिला आहे. ‘माझा जन्म देशभक्त कुटुंबात झाला आहे, पक्षाच्या पलीकडे काही विचार असतात त्या मान्य केल्या पाहिजे’ असे म्हणत त्यांनी ३७० रद्द करण्याला पाठींबा दिला आहे. रोहतक येथे जाहीर सभेत ते बोलत होते.

दरम्यान भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी यावेळी हरियाणामध्ये आमचे सरकार आले तर आंध्र प्रदेशच्या धर्तीवर नोकरीमध्ये भूमिपुत्रांना ७५ टक्के आरक्षण देऊ असे आश्वासन दिले आहे.