मी देशासाठी पंतप्रधान, मात्र तुमच्यासाठी कार्यकर्ताच: मोदी

0

वाराणसी :लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर आज नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथील मतदारांचे आभार मानण्यासाठी रॅली काढली. यावेळी त्यांनी मतदारांचे आभार मनात कृतज्ञता व्यक्त केली. याआधी त्यांनी बाबा विश्वनाथ मंदिरात पूजा केली. भाषणाच्या सुरवातीला मोदींनी हर हर महादेवचा नारा दिला. कार्यकर्त्यांचा आदेशाचे पालन करतो. यावेळी मोदींनी देशाने मला पंतप्रधान म्हणून जरी निवडले असेल पण मी तुमच्यासाठी कार्यकर्ताच असेन. तुमचा आदेश हा प्राधान्याने असेल, असे म्हणाले.

वाराणसीमध्ये कार्यकर्त्यांनीच प्रचार केला. काशीच्या लोकांनी ही निवडणूक एक पर्व मानले. देशातील राजकीय वातावरणात हिंसकपणा वाढला आहे. बंगाल, केरळ, त्रिपुरा आणि काश्मीरमध्ये आमच्या हजारो कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये तर सुरुच आहे, असा आरोप मोदी यांनी केला. काशीच्या मुलींनी स्कूटी यात्रा काढली होती, जी पूर्ण जगभरात चर्चेत होती. या विजयाने हे दाखवून दिले आहे की अंकगणिताच्या पुढे केमिस्ट्री असते, असेही मोदी यांनी सांगितले. आमच्या सरकारने सर्व जातींना एकत्र घेऊन जाण्याचे काम केले आहे. असे केले नसते तर आम्ही तिथेच राहिलो असतो. सवर्णांना आरक्षण हा त्याचाच भाग आहे. संसदेचा वापर चर्चा करण्यासाठी व्हायला हवा. जेव्हा विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसतो, तेव्हा ते दंगा करतात. विरोधकांकडे संख्याबळ नसणे हे त्यांचेच कृत्य आहे. त्रिपुरामध्ये डाव्यांच्या सरकारवेळी विरोधकांना संपविण्यात आले होते. मात्र, आमची सत्ता आल्यानंतर तेथे हा बदल झाला आहे, असेही मोदी यांनी सांगितले.