हे देखील वाचा
मुंबई:हिंदीचा छोटा पडदा गाजवणारं एक नावं म्हणजे ‘एकता कपूर’. केवळ छोटा पडदाच नव्हे; तर मोठ्या पडद्यावरही तिनं चांगलं प्रस्थ निर्माण केलं आहे. ‘कसोटी जिंदगी की’, ‘क्योंकी सांस भी कभी बहू थी’, ‘कहानी घर घर की’, ‘हम पाच अशा’ मालिकांमधून अनेकांना यशाच्या शिखरावर पोहोचवण्याचं काम एकतानं केलं आहे. यासोबतचं एकताबद्दल आणखी एक गोष्टी प्रसिद्ध आहे ती म्हणजे तिचा ‘राग’ आणि खडूस बॉस म्हणून असलेली तिची ओळख. मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत एकता तिच्या रागाबद्दल मनमोकळेपणानं बोलताना दिसली.
लोकांना मी एक क्रूर, कठोर आणि खडूस बॉस वाटत असेल; तर आहे मी नागिणीसारखी बॉस…जी प्रत्येकवेळी डसण्यासाठी तयार असते’ ,असं एकता म्हणाली. त्यानंतर तिच्या या स्वभावामागंच खरं कारण उलघडताना तिनं अनेक गोष्टी सांगितल्या. ‘खरं सांगायचं तर लोक मला घाबरतात या गोष्टीचा मला त्रास होतो.मी कामाप्रति निष्ठा असणारी निर्माता आहे. माझं माझ्या कामावर अत्यंत प्रेम आहे. त्यामुळं माझ्यासोबत काम करणाऱ्यांकडूनही मला चांगल्या कामाची अपेक्षा असते. कामं वेळेवर झाली तर मला राग येणं सहाजिकच आहे’, असंही एकता म्हणतेय. पुरुष निर्मात्यांसोबत तिच्या होणाऱ्या तुलनेवरही एकतानं भाष्य केलं आहे. ‘माझ्या जागी पुरुष निर्माता असता आणि त्यानं रागात शिव्या दिल्या किंवा सहकाऱ्यांना सुनावलं तर ते कोणालाचं खटकलं नससं, या गोष्टीची फार चर्चाही होत नाही; कारण तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो. मात्र याच गोष्टी जर एका महिलेनं केल्यातर त्याच्याबद्दल आक्षेप घेतला जातो.