‘मी पुन्हा येईल’, योग्य वेळेची वाट बघा; देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

0

मुंबई: राज्याच्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांचे अभिनंदनपर भाषण केले. त्या भाषणाला उत्तर देत विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईल असे म्हटले होते, मी पुन्हा आलो आहे, सर्वाधिक १०५ जागा देऊन जनतेने मला आणले. मी पुन्हा कधी येईल असे म्हणत असताना कधी येईल हे म्हटले नव्हते, त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो ‘मी पुन्हा येईल’ योग्य वेळेची वाट बघा असा दावाही फडणवीस यांनी केला. सध्याचे राजकीय समीकरण पाहता मला पुन्हा येण्यास काहीही अडचण नाही असेही संकेत फडणवीस यांनी दिले.

आम्ही मंजूर केलेल्या प्रकल्पाच्या उद्घाटनाला देखील आम्हीच येऊ शकतो, असे झाल्यास आश्चर्य वाटू देऊ नका असा टोलाही फडणवीस यानी लगावला.