‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमात सहभागाची संधी

0

मुंबई : दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच आकाशवाणीवरून प्रसारित होणारा “मी मुख्यमंत्री बोलतोय” हा कार्यक्रम यावेळी “सर्वांना परवडणारी घरे” या विषयावर होणार असून या कार्यक्रमासाठी दि. 27 जून 2017 पर्यंत प्रश्न पाठवावेत, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकांना आपले प्रश्न पाठवून थेट या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार असून हे प्रश्न त्यांना mmb.dgipr@gmail.com या ई-मेल वर तसेच 8291528952 या क्रमांकावर व्हॉटसॲपद्वारे रेकॉर्डिंग करून किंवा संदेश स्वरूपात पाठवता येतील. सोबत आपले छायाचित्रही पाठवता येऊ शकेल.

“सर्वांना परवडणारी घरे” या विषयावर आधारित असलेल्या या कार्यक्रमात महारेरा, म्हाडा, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी), रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, शहरांचा विकास आराखडा, झोपडपट्टी पुनर्विकास योजना, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास आदी विषय समाविष्ट असतील. या कार्यक्रमात नगरविकास, गृहनिर्माण, ग्रामविकास विभाग तसेच सिडको, महारेरा, म्हाडा, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यासारख्या प्राधिकरणांचा समावेश असेल, असेही महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे.