‘मी राष्ट्रवादीतच’; विजयसिंग मोहिते पाटीलांचा गौप्यस्फोट !

0

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. त्यातील प्रमुख नेते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील आणि त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील होते. रणजितसिंह मोहिते पाटीलांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र त्यांचे वडील विजयसिंग मोहिते पाटील यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला नव्हता. दरम्यान आज बुधवारी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात विजयसिंग मोहिते पाटील यांनी ‘मी राष्ट्रवादीत’चे सांगत मोठे गौप्यस्फोट केले आहे. भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे. मात्र असे असले तरी राज्यात अनपेक्षितपणे महाविकासाआघाडीचे सरकार आल्याने अनेक नेत्यांनी आपली भूमिका सोयीस्कररीत्या बदलल्या. त्यात विजयसिंग मोहिते पाटील यांचाही आता समावेश झाला आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आज पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अजित पवार आदी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे भविष्यातील राजकीय गणित ओळखून विजयसिंह मोहिते पाटलांचे सुपुत्र रणजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र भाजपकडून विधानसभेसाठी राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली.